आमच्याबद्दल
आधार फौंडेशन रुकडी
“कर्मण्येवादीकारस्तु माफलेशू कदाचन”
या उक्तीप्रमाणे कार्य करीत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता प्रमाणिकपणे समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याच्या हेतुने प्रेरीत होऊन ज्या मुलांना शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असते पण परीस्थितीसमेार हतबल होऊन शिक्षणाच्या प्रवाहापासुन दूर गेलेल्या मुलांसाठी काही तरी करण्याची इच्छा उराशि बाळगुन श्री.संदिप बनकर यांनी आपले कार्य सुरू केले .
पण हे काम एकट्याने केले तर ते सिमीत राहील आणि या कामात इतरानांही सहभागी करून घेतले तर आपणास जास्तीत जास्त मुलांना मदत करता येईल या भावनेतुन श्री.संदिप बनकर यांनी आपल्या कांही मित्रांना हा विचार सांगीतला आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद ही दिला आणि 23/07/2007 रोजी आधार फौंडेशन रुकडी नावांने एक सेवाभावी संस्था सुरू झाली . संस्था सुरू करताना एक तत्व सर्वानी पाळलेते म्हणेजे संस्थेत जात, धर्म आणि राजकारण या गोष्टींना बिलकुल थारा द्यायचा नाही. कारण गरीबीला कोणताही धर्म नसतो वा कोणतीही जात नसते .शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता ज्या समाजाने आपणास मोठे केले पद, प्रतिष्ठा दिली त्या समाजाचे आपण काहि तरी देणे लागतेा आणि हे ऋण आपण या जन्मीच फेडले पाहीजेत यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील कांही भाग किंवा किमान 100 रुपये समाजातील उपेक्षित लोकांसाठी दिला पाहीजे या भावनेने निधी गोळा करण्यास सुरूवात केली . जमा झालेल्या निधीतुन गरीब होतकरू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना निरपेक्ष भावनेने शैक्षणिक साहित्याची मदत , शाळेची फी , शाळा बाहय परीक्षांना बसण्याची ईच्छा असणा-या मुलांना परीक्षा फी , टायपींग, एम.एस.सी.आयटी ची परीक्षा देणा-या मुलांनी परीक्षा फी अशापद्धतीने मदत देण्यापासुन सुरूवात झाली . आज अखेर आाधार फौंडेशन रुकडीच्या माध्यमातुन 800 मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात आली आहे .त्यापैकी कांही मुले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत आहेत .कांही मुले आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संस्थेस हातभार लावत आहेत. जसजसे संस्थेची कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी समाजातील विविध भागात काम करत असताना समाजातील लोकांना असणा-या अनेक अडचणी व अनेक दुख: समोर येऊ लागली आणि ती दुर करण्याचा प्रंयत्न संदिप बनकर यांनी आधार फौंडेशनच्या माध्यमातून केला आहे .
आम्हाला का निवडा?
वैद्यकीय सहाय्य
वैद्यकीय क्षेत्रातील विविध कामकाजांची मदत करणारा किंवा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत करणारा व्यक्ती, संस्था किंवा उपक्रम असावा लागतो.
शिक्षण सहाय्य
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या अपेक्षा अधिक सुविधा देणे, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मदत करणे,शैक्षणिक साहित्य पुरवठा करणे,शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे
अस्थायी वसाहती सहाय्य
अनाथ बालकांना आरोग्य, शिक्षण, आणि आत्मिक विकासाच्या संबंधित सेवांची पुरवठा करणारा संस्था किंवा उपक्रम असतो
गावांचे विकास
वृक्षारोपण
वृक्षारोपण कार्यक्रमांच्या माध्यमातून प्राकृतिक पर्यावरणाची संरक्षण करण्याचे, जलवायु परिवर्तनाच्या प्रतिक्रियेवर वापर करणारे उपाय असतात.
आपदा सहाय्य
आपदा प्रतिसादात राहत सामग्री पुरवठा करणे, जसे की खाद्य, शेल्टर, पाणी, कपडे, औषधे इत्यादी.सुरक्षित स्थानांकडे प्रवासी व्यक्तींचे निर्धारित करणे आणि त्यांना अस्थायी वासासाठी वसाहती प्रदान करणे.
आमची टीम
Aadhar Foundation-Rukadi has started journey to serve society honestly and sincerely without wanting to return. His aim is to serve the organisation, to help the economically poor children

संदिप राजाराम बनकर
अध्यक्ष

प्रशांत महावीर पाटील
उपाध्यक्ष

शांतीनाथ पाटील
संचालक

सचिन राजाराम बनकर
संचालक

सचिन चव्हाण
संचालक

विशाल शिवाजी तेली
सेक्रेटरी

अमोल आनंदराव मोरे
खजानिस
