GSS_2667
previous arrow
next arrow

स्वार्थ रहित खरी खुरी सेवा हीच खरी प्रार्थना || देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत ||

DWQQ0873

आरोग्य

रोगांशी संघर्ष करून मुलांच्या अस्तित्वाचे संधी वाढवणे.

donation-removebg-preview

शिक्षण

मुलांना उत्कृष्ट आणि मानकीकृत शिक्षणाचे अभ्याससाध्यता देणारे.

people-removebg-preview

बालगृह

प्रेम आणि सहभागाच्या आश्रयाचा घर असलेल्या अप्रेमितांना देणारे.

box-removebg-preview

विकास

आनंददायी आणि पूर्णवत्ता योग्य जीवनाच्या हक्कांची सुरक्षा करणारे.

दिवा होऊन, वात होऊन, उजेड देऊ सारे,
दुःखाच्या अंधारात सुखाचे किरण पसरवू सारे.
हात जोडून नम्र होऊन गरिबांना आधार देऊ,
मदतीचा हात, सेवेचा मार्ग धरून माणुसकीचा धर्म जपू

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय त्याचे अस्तित्व अपूर्ण आहे. ज्या समाजात आपण राहतो, वाढतो आणि घडतो, त्या समाजाचे आपण काही ना काही देणे लागतो. समाजातील गरीब, गरजू, निराधार, दिव्यांग, पीडित, शोषित,आपत्तीग्रस्त आणि संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना आधार देणे, हाच खरा माणुसकीचा धर्म आहे.जात, धर्म, वंश,वय, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि लिंग या सर्व भिंती ओलांडून, "माणुसकी हाच आमचा धर्म" या विचाराने सर्वांना एकत्र घेऊन एकजुटीने कार्य करणारी, रुकडी पंचक्रोशीतील प्रत्येकाला आपली वाटणारी संस्था म्हणजे आधार फाउंडेशन रुकडी. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" या भगवद्गीतेतील प्रेरणादायी विचाराला जीवनमंत्र मानून, गेली 20 वर्षे निःस्वार्थ समाजसेवा करणारी ही संस्था आज असंख्य गरजूंचा आधार बनली आहे. शिक्षण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा, आपत्कालीन मदत, सामाजिक

बांधिलकी आणि मानवतेच्या विविध उपक्रमांद्वारे आधार फाउंडेशन रुकडीने हजारो कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला आहे.राजकारण, जातीयवाद आणि स्वार्थापासून अलिप्त राहून, केवळ समाजहित आणि मानवसेवा हेच ध्येय समोर ठेवून कार्य करणारी आधार फाउंडेशन रुकडी ही संस्था आज प्रत्येकासाठी विश्वासाचे, सेवाभावाचे आणि माणुसकीचे प्रतीक बनली आहे.

"सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म आणि समाजहित हेच आमचे ध्येय."

MAKE A DONATION NOW !

Donate Via Bank Transfer

Bank Details


The Ratnakar Bank Ltd
Account No.309004648622
IFSC Code:RATN0000008
गूगल पे नंबर -976601225
Important Information
  • Please avoid making a donation of less than Rs.500/- as the processing costs make it unviable for us.
  • All donations are eligible for 50% tax benefit under section 80g of the Bombay public trust act.
  • After completing the payment process, you will receive the receipt of your Donation in your registered email

स्वयंसेवक बना

आधार फाऊंडेशन रुकडी या संस्थेमध्ये सहभागी व्हा 

वृक्षारोपण

0 +

स्वयंसेवक

0 +

शैक्षणीक मदत

0 +

व्यसनमुक्ती अभियान

0 +

गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे पाठबळ "विद्येचे दान हेच सर्वश्रेष्ठ दान" असे आपल्या संस्कृतीत मानले जाते. कारण अन्नाचे दान एक दिवसाची भूक भागवते, वस्त्राचे दान काही काळाचे संरक्षण देते; पण शिक्षणाचे दान संपूर्ण आयुष्य उजळवते. म्हणूनच आधार फाउंडेशन रुकडीने आपल्या समाजकार्याची सुरुवात शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून केली. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी बुद्धिमान असूनही आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. एखाद्या विद्यार्थ्याला वह्या नसतात, तर कोणाकडे पुस्तके नसतात; कोणाला गणवेश परवडत नाही, तर कोणाला परीक्षा शुल्क भरणेही अशक्य होते. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने अर्धवटच राहतात. आधार फाउंडेशनने अशा विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्ने ओळखली आणि त्यांच्या भविष्याला आधार देण्याचा संकल्प केला. रुकडी पंचक्रोशीतील गरीब, होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार मदतीचा हात पुढे करण्यात आला. आजपर्यंत १२५० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक मदत करण्यात आली आहे. वह्या, पुस्तके, शालेय गणवेश, परीक्षा शुल्क, स्पर्धा परीक्षा शुल्क तसेच विद्यार्थी दत्तक योजना अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास खंडित होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या कार्याचा लाभ काकासाहेब माने हायस्कूल रुकडी, संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल रुकडी, महात्मा गांधी विद्यालय रुकडी, पायोनियर हायस्कूल अतिग्रे आणि ए. पी. मगदूम हायस्कूल माणगाव या शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. केवळ आर्थिक मदत करून आधार थांबला नाही; तर ज्या विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण नव्हते, जागेची किंवा शांततेची अडचण होती, अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करून त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्याचे कार्यही करण्यात आले. या कार्याचे सर्वात मोठे यश म्हणजे, एकेकाळी आधार फाउंडेशनच्या मदतीने शिक्षण पूर्ण करणारे अनेक विद्यार्थी आज उच्चशिक्षित झाले आहेत. अनेकजण विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात सन्मानाची पदे भूषवत आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, यांपैकी अनेक माजी विद्यार्थी आज आधार फाउंडेशनचे सदस्य, स्वयंसेवक आणि दाते म्हणून या समाजकार्याचा भाग झाले आहेत. ज्यांनी कधीकाळी मदतीचा हात स्वीकारला, तेच आज इतरांना आधार देण्यासाठी हात पुढे करत आहेत. यापेक्षा मोठे यश कोणते असू शकते? आधार फाउंडेशनचा विश्वास आहे की, एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे म्हणजे एका संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडवणे होय. कारण शिक्षण केवळ एका व्यक्तीचे आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत करते. आजही आधार फाउंडेशन रुकडी त्याच निष्ठेने आणि संवेदनशीलतेने प्रत्येक गरजू विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे आहे. कारण संस्थेचा दृढ विश्वास आहे— "एखाद्या विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक देणे म्हणजे त्याच्या हातात उज्ज्वल भविष्याची चावी देणे; आणि शिक्षणासाठी दिलेला प्रत्येक आधार हा समाजाच्या विकासात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक असते."